बीड -अल्पवयीन विद्यार्थिनीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले प्रा विजय पवार आणि प्रा प्रशांत खाटोकर या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारे घटना तीन दिवसापूर्वी उघडकीस आली प्राध्यापक विजय पवार प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांनी आपल्याला लज्जा येईल असे कृत्य करून आपला शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रार एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिल्यानंतर खळबळ उडाली
दरम्यान शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास प्रशांत खाटोकर हा धाराशिव येथून पुण्याकडे मांजरसुंबा मार्गे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच प्राध्यापक विजय पवार हा देखील नगरहून त्याला जॉईन होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने सापळा रचून या दोघांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.
रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीच्या वतीने ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. यावेळी पोलिसांनी मोबाईल रिकव्हर करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी न्यायालयाने 1 जुलै पर्यंत कोठडी सुनावली.
दरम्यान या घटनेतील सिसिटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी वेळ का मागितला नाही अशी चर्चा सुरु आहे.












Leave a Reply