News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250619 WA0026

जितीन रहमान यांनी पदभार स्वीकारला!

बीड -जिल्हा परिषदेचे नूतन सिइओ जितीन रहमान यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी त्यांचे स्वागत केले.

बीड जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांची मागील आठवड्यात बदली झाली. त्यांच्या जागी नियुक्ती झालेले एम मुरुंगनाथम यांनी येण्यासाठी नकार दिला.

त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेचे सिइओ जितीन रहमान यांची नियुक्ती करण्यात आली. रहमान यांनी गुरुवारी 19 जुन रोजी पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *