बीड -उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कारेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधत जॉन्सन चांगलेच रमले. यावेळी जिल्हा परिषदेचे सिइओ यांच्यासह अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगव्हाण येथे प्रवेशोत्सव 2025 मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, *lशिक्षण विस्तार अधिकारी मधुकर तोडकर, जिल्हा समन्वयक संजय मोरे, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत* करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह व पालकांचा सहभाग उल्लेखनीय होता.
या वेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी गेल्या दोन वर्षांपासून कारेगव्हाण येथे एकही बालविवाह न झाल्याचे कौतुक करत, *बीड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी’ शपथ दिली. त्यांनी शिक्षणात सातत्य ठेवण्याचे आवाहन करत गावकऱ्यांच्या सहकार्याची प्रशंसा केली.
शेवटी शाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वगत केले मुख्याध्यापक विकास परदेशी, सहशिक्षक जोगदंड, आणि सहकाऱ्यांनी केले होते. गावात शिक्षण, बालविवाहमुक्ती आणि पर्यावरण यावर सजगतेचा संदेश गेला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply