News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250526 WA0051

माजी आ आर टी देशमुख ठार!

बीड – माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अंबाजोगाई लातूर महामार्गांवर हा भीषण अपघात झाला.

आर टी देशमुख हे औसा येथून परत येतं असताना बेळकुंड नजिक त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. अक्षरशः चेंदामेंदा झालेल्या गाडीत देशमुख यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

1001876404

बीड जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच माजलगावचे आमदार म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहण्यासारखी होती. मध्यन्तरी एका मोठ्या आजारातून बाहेर पडल्यानंतर देशमुख पुन्हा राजकारणात सक्रिय झाले होते.

त्यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *