News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250518 WA0034

गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!

बीड -राष्ट्र्पती पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले आणि त्यांच्या पत्नी नीता गुळभीले या दोघा पती पत्नीने आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान रिलीफ फंडासाठी देत एक आदर्श निर्माण केला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून प्रेरणा घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुळभीले दांपत्याने हा निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होतं आहे.

मागील आठवड्यात भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या युद्धात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला पळता भुई थोडी केली.

यानंतर सिने अभिनेता अक्षय कुमार याने भारतीय जनतेने देशसेवेप्रति प्रत्येक नागरिकांने एक रुपया पी एम रिलीफ फंडासाठी देण्याचे आवाहन केले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सेवेत असताना पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले यांनी जिव्हाळा बेघर असो कि जाणीव प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गोर गरिबांची सेवा केलेली आहे. एड्स ग्रस्ताचे विवाह लाववण्यासारखे सामाजिक उपक्रम देखील त्यांनी राबवले आहेत.

दरम्यान ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देशसेवा काय असते याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार प्रेरित होऊन सूर्यकांत गुळभीले आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद शिक्षिका नीता गुळभीले या दांपत्याने आपला एका महिन्याचा पगार पी एम रिलीफ फंडासाठी दिला आहे.

गुळभीले दांपत्याने जो निर्णय घेतला आहे त्याचा आदर्श इतर कर्मचाऱ्यांनी घेतल्यास देशसेवेचे एक नवे रूप पहायला मिळेल. गुळभीले यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *