बीड -सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिंदे यांना काही दिवसापूर्वी पदोन्नती मिळाली, मात्र स्व आ विनायक मेटे यांच्यापासून अनेक लोकप्रतिनिधी च्या तक्रारी असताना शिंदे यांना प्रमोशन कस मिळाले अशी चर्चा सुरु झाली असून मुख्य अभियंता यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.
बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभागात कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे असोत कि उपाभियंता चंद्रकांत बोराडे सगळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावून आपले उखळ पांढरं करत आहेत.
बीडच्या बांधकामं विभागात शाखा अभियंता असणारे शिंदे यांच्या विरोधात तत्कालीन आ विनायक मेटे यांनी पुराव्यासह तक्रार केली होती. शिंदे यांनी उप अभियंता पदाचा पदभार असताना कोट्यावधी रुपयांची बोगस बिले उचलली, व्हाऊचर पेमेंट च्या नावाखाली करोडो रुपयांचा अपहार केला हे मेटे यांनी पुराव्यासह सरकार दरबारीं मांडले होते.
मात्र मेटे यांच्या अकाली निधनानंतर शिंदे यांनी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांच्यापासून ते मंत्रालयातील अधिकारी मॅनेज केले. यासाठी त्यांनी बराच माल देखील खर्च केल्याची चर्चा आहे.
अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर शिंदे यांना एकदाचे प्रमोशन मिळाले. मात्र त्यांच्याबाबत झालेल्या तक्रारीचा अद्याप निपटारा झालेला नाही. वादग्रस्त अन भ्रष्टाचार करणाऱ्या शिंदे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मुख्य अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.
Leave a Reply