News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशीभविष्य!

‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २९ आॕक्टोंबर २०२४


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४६
🌞 संवत्सर : क्रोधीनाम
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन
🌕 अश्विनी कृष्ण धनञयोदशी/ गुरु द्वादशी
🌸 नक्षञ… उत्तरा
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. २९ आॕक्टोंबर २०२४
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/२७ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩

मेष राशी .
कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचे असणे हे त्याच्या/तिच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

वृषभ राशी .
इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही यामुळे तुमचे नाते सुधारण्या ऐवजी बिघडू शकतात. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर, तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे.

मिथुन राशी .
जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे परंतु, तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे.

कर्क राशी .
तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. तुमच्यावर प्रेम करणाºया आणि तुमची काळजी वाटणाºया लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकतात असे करणे तुमच्या मूडला खराब करेल सोबतच, तुमचा किमती वेळ खराब होईल. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

सिंह राशी .
आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड बडबड करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

कन्या राशी .
तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पु-या करण्याची काळजी घेईल. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

तुळ राशी .
निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

वृश्चिक राशी .
मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकतात. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

धनु राशी .
कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचे ही असेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

मकर राशी .
तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कुंभ राशी .
आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाºयांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.

मीन राशी .
दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका जर, असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे जर, तुम्ही असे केले नाही तर, तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *