News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!

    जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!

    अंबाजोगाई होणार पुस्तकाचे गाव!!          बीड- बीड जिल्ह्यात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न करावेत तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी काम करावे असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत केले. आज त्यांच्या उपस्थितीत 930 कोटी 11 लाख रुपयांचे करार झाले.यावेळी उद्योग तथा मराठी भाषा मंत्री सामंत यांनी अंबाजोगाई…

  • अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!

    अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!

    बीड -शासनाने नोकर भरतीवर बंदी घातलेली असताना अगोदर नियुक्ती दिल्याचे दाखवायचे अन नंतर पगार चालू करायचा असा प्रकार नागपूर मध्ये बोगस शिक्षक भरतीमध्ये झाल्याचे उघडकीस आले. सेम टू सेम अशीच पद्धत बीड जिल्ह्यात देखील अवलंबिली गेली आहे. जवळपास एक हजार पेक्षा जास्तच शिक्षकांची नियुक्ती बोगस पद्धतीने केली गेली आहे. त्यामुळे 2012 ते 2024 या काळात…

  • नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!

    नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!

    बीड -नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा बीडमध्ये देखील झाला आहे. शिक्षण प्रसारक संस्था असो कि शिक्षण प्रसारक मंडळ अशा सर्वच ठिकाणी नाना, मामा, अण्णा, भाऊ, दादा यांच्यासारख्या अनेकांनी मोठा डल्ला मारला आहे. याला शिक्षणाधिकारी यांच्यासहित छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक देखील जबाबदार असल्याची चर्चा आहे. बीडच्या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत झाल्यास…

  • रोकडेश्वर जन्मोत्सवनिमित्त यंदा वस्त्रहरण चा प्रयोग!

    रोकडेश्वर जन्मोत्सवनिमित्त यंदा वस्त्रहरण चा प्रयोग!

    बीड-गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे पारंपारिक पद्धतीने चकलांबा या गावात चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री रोकडेश्वर जयंती साजरी केली जाते यानिमित्त श्री रोकडेश्वर प्रसादिक नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग आयोजित केला जातो तीन दिवशीय असलेल्या या उत्सवासाठी रसिक प्रेक्षकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. चकलांबा या गावात गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे…

  • नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर -महंत नामदेवशास्त्री!

    नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर -महंत नामदेवशास्त्री!

    बीड -नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर आहे. 90 वर्षांपूर्वी भगवान बाबांनी नारळी साप्ताहची सुरवात केली. आज पिंपळनेर येथे 91 वा सप्ताह होतो आहे याचा आनंद आहे. भगवान बाबा वामनभाऊ यांनी डोंगरातील माणसांना माळ घालून माणसात आणलं आज काहीजण माळकऱ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगत महंत नामदेव शास्त्री यांनी नारळी सप्ताहाचा प्रारंभ केला. शिरूर…

  • आपण निर्दोष -वाल्मिकचा न्यायालयात दावा!

    आपण निर्दोष -वाल्मिकचा न्यायालयात दावा!

    बीड -संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण निर्दोष आहोत, माझा या प्रकारणांशी काहीही संबंध नाही असा अर्ज आरोपी वाल्मिक कराड याने केला आहे. यावर्षी पुढील सुनावणीत सीआयडी ने आपले म्हणणे मांडावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सुनावणी पार पडल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराडने…

  • माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!

    माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!

    बीड -वाळू माफिया, रेती माफिया, भूखंड माफिया यांना मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही असा ईशारा देतानाच कोणाच्याही पाया पडू नका, पाया पडण्यासारखे लोक राहिले नाहीत असा म्हणत उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. बीडच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. बीडमध्ये वाळू…

  • सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!

    सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!

    बीड -जिल्ह्यातील शिरूर आणि गेवराई तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या सिंदफना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरीत करण्याच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी…

  • वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण!

    वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण!

    बीड -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सरपंच हत्या प्रकरणात अटक असलेल्या परळीमधील आरोपींमध्ये हा वाद झाल्याची जेल प्रशासनाने पुष्टी केली आहे. दोन गटांमध्ये हा वाद झाला आहे. कोणते दोन गट आहेत? अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. याच कारागृहात संतोष…

  • ईदच्या पूर्वसंध्येला गेवराईत मस्जिदमध्ये स्फोट!

    ईदच्या पूर्वसंध्येला गेवराईत मस्जिदमध्ये स्फोट!

    गेवराई -उरूस मिरवणुकीत झालेल्या वादानंतर गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिद मध्ये जिलेटिन च्या सहाय्याने स्फोट घडवण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. हा स्फोट नेमका का घडवला, याचं कारणही पोलिसांनी शोधून काढलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी याबाबतची माहिती…

Exit mobile version