Maharashtra Sports

बुलढाण्याचा बाला महाराष्ट्र केसरी

जालना -महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटके च्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं, बुलढाण्याचा बाला रफिक शेख याने अभिजित ला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं. गेल्या चार दिवसापासून जालना येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यभरातून तब्बल 900 पेक्षा अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते .