Featured Latest Maharashtra News

दुष्काळ हा भूतकाळ ठरावा – मंत्री जयदत क्षीरसागर

एनव्ही टिम बीड 23/6/19 ANC- समुद्रात वाया जाणार्या पाण्या बाबत राज्य सरकार लवकरच आराखडा तयार करत असून हा आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल जेणे करून मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ ठरेल अस रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री जयदत क्षीरसागर यांनी सांगितले. ते पत्रकारांशी काडीवडगाव येथे बोलत होते.पुढ बोलताना ते म्हणाले की […]

Featured Latest Maharashtra News Top Stories

*गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया प्रकरणात शासनाची वराती मागून घोडे भूमिका….* शस्त्रक्रियेस जिल्हा शल्यचिकित्सकाची परवानगी अनिवार्य

एनव्ही टिम – बीड जिल्ह्यात 4630 या गर्भाशयाच्या पिशवीच्या शस्त्रक्रिया ह्या मागील तीन वर्षात बीड जिल्ह्यात झाल्या असून या शस्त्रक्रिया ह्या ऊसतोड महिला कामगार तसेच बांधकाम मजूर महिलांच्या झाल्या आहेत. यात खाजगी डाॅक्टरांनी पैसे कमविण्यासाठी चक्क हा गोरख धंदा केल्याचं प्राथमिक सर्व्हेक्षणात उघड झाले आहे. माध्यमातून यावर झोड उठविल्यावर शासनास जाग आली असून आता यावर […]

Latest Maharashtra News Top Stories

पवार -ठाकरे युवा पिढी राज्यातल्या राजकारणात नवीन राजकीय समीकरण घडवणार?

एनव्ही टिम- मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा चेहरा आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशीच या दोन राजकीय घरातल्या तरुण नेत्यांची भेट झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. […]

Latest Maharashtra News Top Stories

‘एक शेतकरी, एक डीपी’ योजनेचा शुभारंभ शुक्रवारी ; पालकमंत्री मुंडेची दुष्काळात भेट

एनव्ही टिम बीड ANC- बीड जिल्ह्यात ना पिण्यासाठी पाणी ना जनावरांना चारा अशा दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरयांसाठी एक सुखद बातमी असून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकरयासाठी ‘ एक शेतकरी, एक रोहित्र ‘ (डीपी) ही योजना आणली असून या योजनेचा शुभारंभ शुक्रवारी 14 जून रोजी […]

Latest Maharashtra News Top Stories

छावणीचा रिपोर्ट चांगला देण्यासाठी आधिकारयाने मागितली लाच, गुन्हा दाखल

एन व्ही टीम बीड 24/5/19 ANC- राज्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा ह्या बीड जिल्ह्यात बसत असल्यामुळेशासनाच्यावतीने बीड जिल्ह्यात सर्वाधिक सहाशेपेक्षा जास्त चारा छावण्या सुरूकेले असून या चारा छावण्यांवर देखरेख करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. या पथकांच्या माध्यमातून चारा छावण्यांची तपासणी करण्यात येत आहे ,परंतु चारा छावणी तपासणीस गेलेल्या पथकांनी मात्र अहवाल सकारात्मक देण्यासाठी […]

Latest Maharashtra News Top Stories

शरद पवार आणि सी एम ची दुष्काळावर भेट

एनव्ही टिम मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात राज्यातील भीषण दुष्काळावर सविस्तर चर्चा झाली,यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री राजेश टोपे,आमदार राणा जगजित सिंह, मंत्रालयातील उच्च पदस्थ आधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. […]

Latest Maharashtra News Top Stories

दुष्काळाचा थेट आढावा सरपंचा कडून घेतला मुख्यमंत्र्यानी

एनव्ही टिम- मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पडलेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सरपंचा बरोबर ऑडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या बाबतीत ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या कामकाजाविषयी माहिती घेतली या बरोबरच पाणीटंचाई ,चाराटंचाई, तसेच ग्रामीण भागातील शेतकरी- शेतमजूर यांना देण्यात येणाऱ्या कामाविषयी देखील त्यांनी या […]

Latest Maharashtra News

*दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल*

एनव्ही टिम मुंबई- दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ […]

Featured Latest Maharashtra News Top Stories

शहिद जवान शेख तोसिफ यांच्यावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एनव्ही टिम बीड 2/5/19 ANC- बुधवारी १ मे या महाराष्ट्र दिन गडचिरोली ज़िल्हयात जांभुळखेडा जवळील लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी जो भूसुरंग स्फोट घडविला यात पोलिसांचे वाहन उडवून दिले. या हल्ल्यात जलद प्रतिसाद दलाचे १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनाचा चालकसुध्दा या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे. या स्फोटात बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील शेख तोसिफ आरिफ या […]

Latest Maharashtra News Top Stories

*राज्यपालांचे चहापान रद्द*

एनव्ही टिम- गडचिरोली येथे आज पोलीसांवर झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज (बुध. 1) संध्याकाळी राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या प्रतिंनिधींसाठी चहापान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.