Maharashtra News

लॉक डाऊन मध्ये देश टोलफ्रि !

मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. या पार्श्वभुमीवर केंद्रातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय परिवहन विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे.

देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.