Maharashtra News

चार दिवसात 42 हजार लोक आले जिल्ह्यात ;19 जण होम क्वारांनटाईन !

बीड, दि. २५:- कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेल्या देशातून आलेल्या व्यक्तींना स्वतःच्या घरात अलगीकरण ( होम क्वारनटाईन)करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिलीे आहे.
यामध्ये कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या 12 देशातील 15 व्यक्तींचा तर इतर देशातून आलेल्या ४ व्यक्तींचा समावेश आहे. हे नागरिक आलेल्या देशांमध्ये स्पेन , फ्रान्स, यूएई , कतार , ओमान व अमेरिका आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात असून यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या मार्गांवर महत्त्वाच्या ठिकाणी 14 चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत येथे 24 तास वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभागाने स्थापित करण्यात आलेली पथके कार्यरत आहेत. या पथकांनी आत्तापर्यंत जिल्ह्यात येणारी 42 हजार 131 व्यक्तींची तपासणी केली आहे . याचे अहवाल जिल्हा प्रशासनास सादर केले जात आहेत.
जिल्ह्यात मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून आलेल्या व्यक्ती तसेच तपासणीदरम्यान लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना योग्य त्या वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात कोरोना वरील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय बीड आणि आणि वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्रत्येकी एका आयसोलेशन वॉर्ड व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये प्रत्येकी 25 घाटांची व्यवस्था उपलब्धता आहे
जिल्ह्यात विलगीकरण कक्षात चार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत याच बरोबर फॉरेन टाईम करावयाची आवश्यकता भासल्यास 700 खाटांची व्यवस्था असलेले 11 कक्ष जिल्ह्याभरात सज्ज आहेत . आज पर्यंत कोरोना आजाराची तपासणीसाठी जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 8 स्वाब नमुन्यांपैकी सर्व नमुने अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published.