Maharashtra News

होम क्वारान्टीन वर करडी नजर;बाहेर दिसलात तर थेट जेल -कुंभार

बीड -घरात अलगीकरन(होम क्वारंटाईन)असा शिक्का मारलेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन मोबाईल अँप च्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे,जे कोणी बाहेर पडतील ते थेट जेलमध्ये दिसतील असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात असे लोक आहेत ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अथवा त्यांच्या हातावर असा शिक्का मारला आहे, असे लोक घराबाहेर पडले अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. तर या अँप च्या माध्यमातून त्वरित प्रशासनास त्याची माहीती समजणार आहे.
होम क्वारंनटाईन असा शिक्का असणाऱ्या कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडून आपले तसेच आपल्या जवळच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आणू नये,तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशांचे पालन करावे.याबाबतीत कोणीही उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास अशी व्यक्ती भारतीय दंड संहिता तसेच साथ रोग कायद्या अंतर्गत शिक्षेस पात्र राहील असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार यांनी सांगितले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published.