Maharashtra News

15 एप्रिलपर्यंत देश लॉक डाऊन;संकट मोठं,पण घाबरू नका ;मोदी

नवी दिल्ली -कोरोना विषाणूमुळे देशावर आलेलं संकट गंभीर आहे मात्र त्यासाठी घराच्या बाहेर न पडणे हाच एकमेव उपाय असून देशपवासीयांनी 21 दिवस म्हणजेच 14 ते 15 एप्रिल पर्यंत घरातच रहावे, या काळात देशात लॉक डाऊन असेल अशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा देशवासियांना संबोधित केले .मोदी म्हणाले की,

करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणं आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी इथे मोठी घोषणा करत आहे. ध्यान देऊन ऐका. आज रात्री बारा वाजेपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल,’ असं मोदी यांनी सांगितलं.

आपण त्या टप्प्यावर आहोत.

देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘करोनाचं संकट परतवून लावण्यासाठी एकच पर्याय आहे. घरात राहणं. तुमची एक चूक तुमच्या घरापर्यंत करोनाला घेऊन शकतो. ज्यावेळी करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसाराचा वेग खूप कमी होता. पण, त्यानंतर हे प्रचंड वाढलं. मी देशवासियांना आवाहन करतो. त्यांनी घरातच राहून या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करावी. ही वेळ धैर्यानं सामोर जाण्याची आहे. भारत अशा टप्प्यावर आहे. ज्यामुळे भारता अनेक आर्थिक संकटांचा मुकाबला करावा लागणार आहे. पण, एक लक्षात ठेवा जान है तो जहाॅन है,’ असं म्हणत मोदी यांनी देशवासियांना धीर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.