Maharashtra News

हर्ष पोद्दार नवे एसपी;जी श्रीधर यांची बदली

बीड – बीड चे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची बीड येथून बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची नियुक्ती झाली आहे श्रीधर हे आपल्या शांत स्वभावामुळे बीड जिल्हा पोलिस दलात एक चांगला अधिकारी म्हणून परिचित होते लोकसभा निवडणुकीपूर्वी पासून त्यांच्या बदलीची चर्चा होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहविभागाने राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात श्रीधर यांची बदली राज्य राखीव दलाचे समादेशक म्हणून झाली आहे तर त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्यावर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे
हर्ष पोद्दार यांनी कोलकत्ता येथून लॉ ची पदवी प्राप्त केली असून पदव्युत्तर शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथे घेतले आहे,काही काळ त्यांनी कॉर्पोरेट लॉयर म्हणून लंडन येथे काम केले आहे,2010 च्या बॅच मध्ये यूपीएससी परीक्षा 310 व्या रँकने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.नागपूर पूर्वी त्यांनी औरंगाबाद येथे देखील काम केलेले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.