Maharashtra News Top Videos

Watch “पहिल्याच पावसाने उडवली दाणादाण;केज -कळंब चा संपर्क तुटला,पहा व्हिडीओ” on YouTube

बीड -रविवारी पहाटे बीड जिल्ह्यातील रायमोह,शिरूर,केज या भागात झालेल्या पावसाने नद्या नाल्याना पाणी आले असून केज कळंब रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने केज आणि कळंब चा संपर्क तुटला आहे
बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने जोर धरला असून बीड, गेवराई, माजलगाव,केज ,शिरूर या भागात झालेल्या पावसाने नद्या नाले वाहू लागले आहेत .
बीड तालुक्यातील खालापूरी या गावात झालेल्या पावसाने खोलीकरण केलेल्या ओढ्यात,नद्यांमध्ये अशाप्रकारे पाणी खळखळून वाहू लागले आहे,
केज तालुक्यात झालेल्या पावसाने खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साळेगाव येथील पर्यायी पूल खचला आहे,पहिल्याच पावसात पूल खचल्याने कळंब केज चा संपर्क तुटला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.