Maharashtra News

मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्री डिफॉल्टर;वर्षा बंगल्याकडे साडेसात लाख थकले

बीड – तिकडे सर्वसामान्य माणसाला कडे असलेली वीज अथवा पाणीपट्टी किंवा घर पट्टी वसूल करण्यासाठी पालिकेकडून तगादा लावला जात असताना दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रहात असलेल्या वर्षा बंगला थकबाकीदारांच्या यादीत असल्याचे समोर आले आहे ,त्यामुळे खळबळ उडाली आहे .
माहिती अधिकारात ही बाब उघड झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहत असलेल्या वर्षा बंगल्याकडे महानगरपालिकेची तब्बल आठ लाख रुपायांची थकबाकी आहे तर इतर मंत्र्यांकडे मिळून आठ लाख थकबाकी आहे .एरव्ही सर्वसामान्य नागरिकांकडे दोन पाच हजार थकबाकी असेल तर नळ कनेक्शन कट करणारे प्रशासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्याचा पाणीपुरवठा बंद करणार का,असा सवाल उपस्थित होत आहे .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्षा निवासस्थान

एकूण थकबाकी ७ लाख ४४ हजार, ९८१ रूपये

सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, देवगिरी निवासस्थान

थकबाकी- १ लाख ६१ हजार ५५ रुपये

विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री, सेवासदन निवासस्थान

थकबाकी- १ लाख ६१ हजार, ७१९ रुपये

पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थान

थकबाकी ३५ हजार ३३ रुपये

दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान

थकबाकी १ लाख ५ हजार ४८४ रुपये

सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान

थकबाकी २ लाख ४९ हजार २४३ रुपये

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम, नंदनवन निवासस्थान

थकबाकी २ लाख २८ हजार ४२४ रुपये

चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री, जेतवन निवासस्थान

थकबाकी ६ लाख, १४ हजार ८५४ रुपये

महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी निवासस्थान

थकबाकी १ लाख ७३ हजार ४९७ रुपये

ज्ञानेश्वरी निवासस्थान

थकबाकी ५९ हजार ७७८ रुपये

सह्याद्री अतिथीगृह

थकबाकी १२ लाख, ४ हजार ३९० रूपये

असे हे थकबाकीचे आकडे आहेत. महापालिकेने वर्षा बंगल्याचं नाव डिफॉल्टर यादीत टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.