Maharashtra News

मोदींचा दणका;27 अधिकारी पाठवले घरी !

नवी दिल्ली -देशातील भ्रष्टाचार समूळ उच्चाटन करण्यासाठी ना खाऊंगा ना खाणे दुगा अशी घोषणा देत पुढाऱ्यांसह सरकारी अधिकाऱ्यांना वेसण घालणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेताच मोठा दणका दिला आहे .अर्थ मंत्रालयाने सचिव दर्जाच्या तब्बल 15 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे,चार दिवसात मोदी यांनी एकूण 27 भ्रष्ट अधिकारी घरी पाठवले आहेत .

कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या नियम ५६ चा आधार घेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कठोर पाऊल उचललं होतं. गेल्या आठवड्यात टॅक्स डिपार्टमेंटमधील १२ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त करण्यात आलं होतं. प्राप्तिकर विभागात मुख्य आयुक्त, आयुक्त अशा पदांवरील व्यक्तींना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यातील बऱ्याच जणांवर भ्रष्टाचार, बेहिशेबी संपत्ती, लैंगिक शोषणाचे आरोप असल्याचं समजतं. त्यानंतर आता १५ जणांची गच्छंती करण्यात आलीय. ५० ते ५५ वर्षं पूर्ण केलेल्या आणि ३० वर्षांची नोकरी झालेल्या अधिकाऱ्यांना अनिवार्य निवृत्ती देण्याची तरतूद नियम ५६ मध्ये आहे. त्या अन्वये अकार्यक्षम अधिकाऱ्यांना सरकार निवृत्त करू शकतं. तोच नियम वापरून सरकारने २७ जणांना नारळ दिला असला, तरी त्यात भ्रष्टाचाराचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचं दिसतं.

सेंट्रल बोर्ड ऑफ इन्डायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स विभागातून सक्तीची निवृत्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं अशीः
प्रधान आयुक्त डॉ. अनूप श्रीवास्तव, आयुक्त अतुल दीक्षित, संसार चंद, हर्षा, विनय व्रिज सिंह, अतिरिक्त आयुक्त अशोक महिदा, वीरेंद्र अग्रवाल, उप आयुक्त अमरेश जैन, सहआयुक्त नलिन कुमार, सहायक आयुक्त एसएस पाब्ना, एस एस बिष्ट, विनोद सांगा, राजू सेकर, उप आयुक्त अशोक कुमार असवाल आणि सहायक आयुक्त मोहम्मद अल्ताफ

Leave a Reply

Your email address will not be published.