Featured

शनिवारी करा ही कामं !

मेष

श्रीगणेश सांगतात की आज सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींत संपर्क साधाल. गूढ, रहस्यमय विद्या आणि गाढ चिंतनशक्ती आपला मानसिक भार हलका करील. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी चांगला योग आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रू आपली हानी करतील. नवीन कार्य सुरू करू नका.

वृषभ

कुटुंबीयांसमवेत सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे घडेल. त्यामुळे वेळ आनंदात जाईल. शरीर आणि मनाला प्रसन्न वाटेल. सार्वजनिक जीवनात यश आणि कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून वार्ता मिळतील.

मिथुन

अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य राहील. कामात यश आणि कीर्ती लाभेल. इतरांशी बातचित करताना रागावर ताबा ठेवा आणि मितभाषी राहा म्हणजे मतभेदाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. नोकरदारांना लाभ होईल.

कर्क

शांतपणाने दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमिकांमध्ये वादविवाद झाल्यामुळे रुसवे- फुगवे होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण किंवा कामुकता आपणाला संकटात टाकेल. त्या दृष्टीने लक्ष द्या. नवीन कार्यारंभ अथवा यात्रा न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

सिंह

श्रीगणेश सांगतात की मानसिक अस्वस्थता राहील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करायला दिवस योग्य नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गापासून जपून राहा.

कन्या

विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा श्रीगणेश देतात. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भाऊ- बहिणींशी ताळमेळ जुळेल. मित्र आणि स्नेह्यांशी संवाद घडतील. गूढ, रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आणि त्यात सिद्धी प्राप्त होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.

तुळ

आज मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम राहणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांशी मतभेद होतील. नाहक खर्च होईल. तब्बेत बिघडेल. मनात ग्लानी निर्माण होईल. अनैतिक प्रवृत्तीकडे न वळण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबातील व्यक्तींशी वागण्यात दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील प्रिय व्यक्तींशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ आणि प्रवासाचे योग आहेत. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल.

धनू

आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे भांडणाचे कारण ठरेल. दुर्घटनेपासून जपा. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचला, असे श्रीगणेश सांगतात. निरुपयोगी कामांवर आपली ताकत खर्ची पडेल.

मकर

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तींशी मुलाखत रोमांचक बनेल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्‍यांना धंद्यात आणि नोकरदारांसाठी नोकरीत उत्पन्न वाढेल. गृहस्थीजीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.

कुंभ

प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. नोकरी- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. तब्बेत चांगली राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढतीचे आणि धनप्राप्तीचे योग आहेत. गृहस्थीजीवन आनंदी राहील आणि मानप्रतिष्ठा वाढेल.

मीन

भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने निराशा पैदा होईल. नशिबाची साथ नाही असे वाटेल. कार्यालयात अधिकारी वर्गाशी काम करताना जपून वागण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. संतती हे आजच्या चिंतेचे कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.