Maharashtra News Top Videos

Watch “जिल्ह्यात ईदचा उत्साह;धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा, पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – हिंदू मुस्लिम मधील सलोखा परळीकरांनी कायम ठेवला आहे. दिवाळीत मुस्लिम बांधव हिंदूना शुभेच्छा देतात तर ईदला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात नेहमी प्रमाणे ईदगाह परिसरात विविध पक्षाचे मंडप उभे करण्यात आले.यावेळी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या .

ईदची मुख्य नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधवांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा स्विकारतात. राज्याचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीतील मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाड्याचे प्रमुख नागरसेवकांसह सभापती पदाधिकारी उपस्थीत होते.
बीड शहरात १५ ठिकाणी सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. नई ईदगाह, दर्गाह मज्जिद, मरकस मज्जिद, जामा मजीत तसेच शहरातील प्रमुख मज्जीदी मध्ये मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. या पवित्र रमजानचे औचित्य साधत अनेक ठिकाणी बाजारपेठा सजल्या होत्या. तर या सणासाठी दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तालुका दूध संघाने विविध ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published.