Latest Maharashtra News Top Stories

छावणीचा रिपोर्ट चांगला देण्यासाठी आधिकारयाने मागितली लाच, गुन्हा दाखल

एन व्ही टीम

बीड

24/5/19

ANC-

राज्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा ह्या बीड जिल्ह्यात बसत असल्यामुळेशासनाच्यावतीने बीड जिल्ह्यात सर्वाधिक सहाशेपेक्षा जास्त चारा छावण्या सुरूकेले असून या चारा छावण्यांवर देखरेख करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. या पथकांच्या माध्यमातून चारा छावण्यांची तपासणी करण्यात येत आहे ,परंतु चारा छावणी तपासणीस गेलेल्या पथकांनी मात्र अहवाल सकारात्मक देण्यासाठी लाच मागण्याचे प्रकार बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत . असाच एक प्रकार बीड तालुक्यातील शिवनी या ठिकाणी असलेल्या चारा छावणी वर घडला. तपासणीस आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनी संबंधित चारा छावणी चालकास छावणीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी पंधरा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी छावणी चालकांनी वेळीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केल्यामुळे या पथकातील तीन अधिकाऱ्याविरुद्ध सविस्तर चौकशी अंती लाच मागणी वरूण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहे..

दरम्यान दुष्काळाची तीव्रता वाढत असताना प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी हे जनावरांना निवारा ,चारा, तसेच पाण्याची सोय करणाऱ्या छावणीचालकाकडून अहवाल सकारात्मक देण्यासाठी लाचेची मागणी करताना चे प्रकार वाढत असतानाच दिसत आहे.

यावर जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी वेळीच पायबंद घालावा अशी मागणी चारा छावणी चालकां कडून होत आहे ….

Leave a Reply

Your email address will not be published.