Maharashtra News

Watch “कोचिंग क्लासला आग,19 विद्यार्थ्यांचा मृत्यू ; जीव वाचवताना अनेकांनी टाकल्या उड्या ; पहा व्हिडीओ” on YouTube

गुजरात – गुजरातमधील सुरतच्या एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 19 मुलांचा मृत्यू झाला. तक्षशिला आर्केड इमारतीत हे भीषण अग्नीतांडव पाहायला मिळालं. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत होता. याच कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली.
आग लागली तेव्हाही हा क्लास सुरु होता. आग लागल्यानंतर क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला. बाहेर निघायला कुठलाही मार्ग नसल्याने जीव वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क चौथ्या मजल्यावरुन खाली उड्या घेतल्या. यामध्ये आतापर्यंत 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अग्नीशमन दलाच्या गाड्या आग लागलेल्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट खाली उड्या घेतल्या. अग्नीशमन दलासमोरच हा मृत्यूचा तांडव सुरु होता, मात्र अग्नीशमन दल या विद्यार्थ्यांना वाचवण्यात अपयशी ठरलं.
तक्षशिला आर्केड ही इमारत एक व्यावसायिक इमारत आहे. व्यावसायिक इमारतीत कोचिंग क्लास घेण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्यासोबतच जेव्हा या इमारतीचं ऑडीट करण्यात आलं तेव्हा इथे अशा आप्तकालीन परिस्थितीत बाहेर निघण्यासाठी कुठला पर्याय आहे की नाही, याची तपासणी का केली गेली नाही, असे प्रश्न आता नागरिग उपस्थित करत आहेत. सुरत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इतकी मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप आता स्थानिकांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.