Maharashtra News

Watch “थँक्स बाबा म्हणत विजय मुंडेंना समर्पित ; काय म्हणाल्या पंकजा मुंडे ,पहा व्हिडीओ” on YouTube

परळी – ‘थॅक्यू, बाबा’ म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी आज सायंकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर नतमस्तक होत लोकसभा निवडणुकीतील विजय त्यांना समर्पित केला. दरम्यान, विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी बीडकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी ना. पंकजाताई व खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांचे जंगी स्वागत केले, त्यांच्या अभूतपूर्व विजयाबद्दल आज जिल्हयात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली.

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी विक्रमी मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय प्राप्त केला. सायंकाळी विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी डाॅ प्रितमताई हया ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह बीडकडे रवाना झाल्या. बीडला जाण्यापूर्वी त्यांनी डाॅ अमित पालवे, गौरव खाडे यांच्यासह परळीत प्रभू वैद्यनाथाचे तसेच दक्षिणमुखी गणपतीचे दर्शन घेतले.

*गोपीनाथ गडावर नतमस्तक*

ना. पंकजाताई व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी नंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ‘थॅक्यू, बाबा’ म्हणत त्यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांना समर्पित केला व त्यांचे आभार मानले. ‘संडे टू मंडे, गोपीनाथ मुंडे,’ ‘मुंडे साहेब अमर रहे’ अशा घोषणांनी गडाचा परिसर यावेळी दणाणून गेला होता.

*गुलालांची उधळण अन् फटाक्यांची आतिषबाजी
ना. पंकजाताई व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या वाहनांचा ताफा बीडकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कांही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी जेसीबी मशिनने गुलाल उधळला तर कांहीनी स्वागतासाठी भले मोठे पुष्पहार आणले होते, प्रत्येक गावांत व चौका चौकात त्यांचे जंगी स्वागत झाले, जिल्हयात यानिमित्ताने अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.