Maharashtra News

Watch “डी जे च्या तालावर पंकजा,प्रीतम चा ठेका; पहा व्हिडीओ” on YouTube

बीड लोकसभा मतदार संघातून तब्बल दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याची आघाडी घेऊन विजय मिळवल्यावर पंकजा मुंडे,प्रीतम मुंडे यांनी आपल्या पतीराजांसोबत फुगड्या खेळत डी जे च्या तालावर ठेका धरला .
बीड लोकसभा मतदार संघातून 25 व्या मतमोजणी फेरी अखेर डॉ. प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांना 1 लाख 53 हजार मतांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी परळी येथील यशश्री बंगल्यावर एकच जल्लोष केला.
पालकमंत्री पंकजाताई मुंडे, डॉ. अमित पालवे, उमेदवार डॉ. प्रीतमताई मुंडे व त्यांचे पती गौरव खाडे हे स्वतः कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवात सामील झाले, एवढेच नव्हे तर या सर्व कुटुंबाने गुलालाची उधळण करत DJ च्या तालावर फुगडी खेळली. या प्रसंगाने कार्यकर्त्यांच्या जल्लोषात अधिकच भर पडली. या भरीत भर म्हणून *डॉ. अमित पालवे यांचा डान्स विशेष आकर्षणाचा विषय ठरला* डॉ. प्रीतमताई यांच्या विजयाने *ना. पंकजा मुंडे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा झळाळून निघाले

Leave a Reply

Your email address will not be published.