Maharashtra News

धस पुन्हा ठरले डॉन ; दिली 60 हजारापेक्षा जास्तीची आघाडी

बीड – विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी केलेल्या मदतीची परतफेड करीत आ सुरेश धस यांनी लोकसभा निवडणुकीत तब्बल 60 हजार पेक्षा अधिकचे मताधिक्य देऊन केली .सहा मतदार संघांपैकी सर्वात जास्त मताधिक्य आष्टी मतदार संघाने दिली आहे हे विशेष .
बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते,जिल्ह्यातील सहा पैकी पाच मतदार संघ भाजपकडे आहेत तर एकमेव बीड मतदार संघाच्या आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही भाजपलाच मदत केली होती .भाजपच्या उमेदवार डॉ प्रीतम मुंडे यांना सर्वाधिक 60 हजारापेक्षा जास्त मताधिक्य आष्टी मतदार संघातून मिळाले आहे .
विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस यांना प्रवेश देत पंकजा मुंडे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती तसेच साम, दाम, दंड,भेद या सर्व नीतीचा वापर करीत त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता .धस यांच्याकडे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले होते .
धस हे किती मतांची आघाडी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या .पंकजा मुंडे या इ केलेल्या उपकाराची परतफेड धस यांनी केली असेच म्हणावे लागेल .
आष्टी मतदार संघातून सर्वाधिक 60 हजार पेक्षा जास्त मताधिक्य प्रीतम मुंडे यांना मिळवून दिले .धस हे या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा डॉन ठरले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.