Maharashtra News

बहिणीची भावाला धोबीपछाड ; प्रीतम मुंडेंचा मोठा विजय

बीड
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये बहीण पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडे यांना धोबीपछाड देत प्रीतम मुंडे यांच्या विषयांमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे प्रीतम मुंडे या दीड लाखापेक्षा जास्त फरकाने विजयी झाले असून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना मिळालेल्या एक लाख 36 हजार मतापेक्षा ही 15000 मध्ये अधिक घेतले आहेत संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन बहीण भावाच प्रतिष्ठेची लढाई लढली गेली धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्या साठी बीड लोकसभा मतदारसंघात 70 पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या पंकजा मुंडे यांनी देखील संपूर्ण ताकद पणाला लावली होती बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे पाच आमदार असून राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी देखील भाजपला मतदान करीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्याचा निर्णय घेतला होता बजरंग सोनवणे यांच्या साठी धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा पराभव झाल्याने धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published.