Maharashtra News

Watch “जे अंधारात केलं ते उघड झालं :संदीप यांची काकांवर टीका;पहा व्हिडीओ” on YouTube

बीड –
मागील पंधरा वीस वर्षापासून जयदत्त क्षीरसागर हे ज्या पक्षाला मदत करत होते ती मदत आता उघड झाली असून ते सत्य शिवाय राहू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी जातिवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला अशी टीका संदीप क्षीरसागर यांनी केली.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी बीड लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठींबा देत आपली भूमिका स्पष्ट केले होते मात्र लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांनी अचानकपणे मुंबईत मातोश्रीवर जात शिवबंधन बांधून घेतले तत्पूर्वी क्षीरसागर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आपल्याला पक्षाने मानसन्मान दिला नाही राष्ट्रवादीने नेहमीच आपल्याला अडचणीत आणले आपल्या घरात जे काही महाभारत घडले त्यालादेखील राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते जबाबदार असल्याचे क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
याबाबत संदीप शिरसागर यांनी मात्र कठोर शब्दात आपल्या काकांवर टीका केली आहे नगरपालिका निवडणुकीत पासूनच मला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले छोट्या काकांबद्दल वारंवार तक्रारी करून देखील जय दत्तांनी आपले म्हणणे लक्षात घेतलेच नाही नगरपालिका असुदे जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना सर्वाधिकार दिले होते असे असतानाही तीन वेळा आमदार की तीन वेळा मंत्रिपद त्याचबरोबर नगराध्यक्षपद अशी सगळी सत्ता त्यांच्याकडे पक्षाने दिले असताना देखील ते सत्ते शिवाय राहू शकत नाहीत हे त्यांनी दाखवून दिले आहे असे सांगत ज्या काकू नानांनी आयुष्यभर जातीयवादी पक्षाला विरोध केला त्याच पक्षात शोधतांना यांनी प्रवेश करून आपले मनसुबे उघड केले आहेत असेही संदीप यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.