Maharashtra News Top Stories

अमावस्येला बीडमध्ये भूकंप

बीड -लोकसभा निवडणूक रंगात आलेली असताना सुद्धा बीड जिल्ह्यातील दिग्गज घराणे म्हणून लौकिक असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शांत आहेत,राष्ट्रवादी पासून चार हात लांब असलेल्या क्षीरसागर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही,त्यामुळे ते काय करणार हा राष्ट्रवादी सह सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे मात्र दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी आपली भूमिका ठरवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.त्यामुळे अमावस्येला बीडमध्ये राजकीय भूकंप होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बीड जिल्ह्याच्या राजकारणात मागील चाळीस वर्षांपासून आपला वेगळा दबदबा राखून असलेल्या माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात। नगर पालिका निवडणुकीपासून सुरू झालेला गृहकलह शिगेला पोहचला आहे .पुतणे संदीप यांना राष्ट्रवादी कडून पाठबळ मिळत असल्याने जयदत्त क्षीरसागर पक्षावर नाराज होते .राष्ट्रवादी चा उमेदवार ठरवण्यापासून ते उमेदवारी जाहीर करून अर्ज दाखल करेपर्यंत ते बाजूलाच आहेत.प्रचार सुरू होऊन दहा बारा दिवस झाले तरी त्यांनी आपली भूमिका न ठरवल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

अखेर शुक्रवारी क्षीरसागर यांनी व्यापक कार्यकर्ता बैठकीचे आयोजन आशीर्वाद लॉन्स येथे केले आहे .शुक्रवारी अमावस्या आहे त्याच दिवशी क्षीरसागर हे राष्ट्रवादी सोबत राहणार की भाजप ला साथ देणार हे जाहीर होणार आहे,त्यामुळे या दिवशी बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.