Latest Maharashtra News Sports

मी राजकीय मैदानावरचा पहेलवान- धनंजय मुंडे

एनव्ही टिम

कागल (दि 3 मार्च)-मी कुस्ती मधला पहेलवान नसलो तरी राजकीय मैदानावरचा पहेलवान आहे. मातीतला, माती खालचा बदल आम्हाला कळतो, बदल घडणार आहे परिवर्तन घडणार आहे असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे

कुस्तीची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बानगे गावात आशियाई सुवर्ण पदक विजेते व उपमहाराष्ट्र केसरी मा. पै. रविंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खुल्या मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूर म्हटलं तर रांगडेपणा समोर येतो. रांगडेपणा म्हटलं तर कुस्ती समोर येते असे सांगताना कुस्तीची फार आवड असल्याने भाषणाऐवजी कुस्तीची कॉमेंट्री करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा आहे. आज तालीमीसाठी योग्य रसद नाही. खेळाडूच्या खानपानाकडे लक्ष दिले जात नाही. बानगे गावात कुस्तीच्या तालमीसाठी जी कमतरता जाणवत आहे ती कमतरता दूर करण्याची तसेच येणाऱ्या काळात सुसज्ज तालीम उभी करण्याची खात्री दिली.

यावेळी त्यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्यातील अनोखं नातं उलगडले. मुश्रीफ यांचे चिरंजीव हे आमच्या जिल्ह्याचे जावाई आहे, त्यामुळे आमंत्रण नाकारता आलं नाही असं म्हणत त्यांनी सर्वांची मनं जिंकली. आपले खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा खमेके कुस्तीपटू आहे. ते विरोधकांना राजकारणात वेळोवेळी चितपट करतात. राजकारणातील कुस्तीत त्यांच्यामागे आपली ताकद उभी करा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published.