Maharashtra News

विनायक मेटे यांचा राजीनामा !

बीड -शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे  आमदार विनायक मेटें यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याबद्दलची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.आवश्यकता असल्यास मी सदैव सहकार्य करेल असेही मेटेंनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे […]

Maharashtra News

राहुल रेखावार नवे जिल्हाधिकारी !

  बीड -गेल्या दोन अडीच महिन्यापासून रिक्त असलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी पदी राहुल रेखावार यांची नियुक्ती झाली आहे .रेखावार हे मूळचे खडकी बाजार, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले. बारावीच्या परीक्षेत ते बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याविषयात […]

Maharashtra News

समाजकल्याण विभागात सुरू होणार मध्यान्ह भोजन !

मुंबई – आदिवासी विभागातील शासकीय वसतीगृहांसाठी ज्याप्रमाणे मध्यवर्ती भोजनगृह सुरु आहे त्याच धर्तीवर सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती भोजनगृह योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे दिली.सामाजिक न्याय विभागात शासकीय वसतीगृहांसाठी मध्यवर्ती भोजनगृह सुरु करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. […]

Maharashtra News

गुरुकुलच्या अन्वी चे यश !

बीड – गुरुकुल इंग्लीश स्कूलची विद्यार्थीनी कु .अन्वी आनंद छाजेड हिने पुणे येथे झालेल्या डॉ .होमी भाभा बालवैज्ञानिक संशोधन स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवत मुंबई येथे होणाऱ्या तिसऱ्या पात्रता परीक्षेसाठी प्रवेश मिळवला आहे . बीड येथील गुरुकुल इंग्लीश स्कूलची सहावी वर्गातील विद्यार्थीनी कु .अन्वी छाजेड हिने दि .8 डिसेंबर रोजी पुणे येथे झालेल्या दुसऱ्या फेरीतील पात्रता […]

Maharashtra News

धनंजय मुंडेंची मागणी अजित पावरांकडून मान्य !

औरंगाबाद – बीड जिल्ह्याचा सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 300 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बीड जिल्ह्याला 58 कोटी रुपये वाढवून मिळाले आहेत. येथील विभागीय आयुक्त […]

Entertainment Featured Maharashtra

आय. एम.ए.बीड तर्फे वरीष्ठ डाॅक्टरांचा सन्मान

एनव्ही टिम बीड काही वर्षांपूर्वी तपासणीच्या अत्याधुनिक सुविधा नव्हत्या तरीही केवळ लक्षणे आणि रुग्णाची शारीरिक तपासणी करुन अचूक रोग निदान करुन रूग्णाचे प्राण वाचवणा-या या डाॅक्टर प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बीड आय एम ए शाखेच्या वतीने वरिष्ठ डाॅक्टरांचा सन्मान करण्यात आला. ७१व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आय. एम.ए. बीड शाखेच्या वतीने बीड येथील वरिष्ठ व […]

Maharashtra News

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी सूत्र हलवली अन 48 तासात अंधांचे कल्याण झाले !

बीड दि. २६….. : प्रशासकीय काम अन सहा महिने थांब असा आजवरचा अनुभव असताना अवघ्या 48 तासात काम झाल्याचा अनुभव निराधार लोकांनी घेतला अन धनंजय मुंडेंच्या रूपाने एक आधार लाभल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली . सोशल मीडियावर प्रचंड गाजलेल्या बीड तालुक्यातील साक्षाळ पिंप्री येथील त्या पाच अंध व्यक्तींना तसेच सबंध बीड जिल्ह्याला आज पालकमंत्री […]

Maharashtra News

भाजपची धुरा आता मस्केन्च्या खांद्यावर !

बीड -भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली,खा प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली .मस्के यांनी पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे यावेळी सांगितले . भाजपच्या संघटनात्मक निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे,तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली […]

Maharashtra News

बिंदुसरा नदीच्या संवर्धनासाठी संदीप क्षीरसागर लागले कामाला !

बीड, प्रतिनिधी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीचे संवर्धन,सुशोभीकरण यासाठी आ संदीप क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली,लवकरच जलसंपदा,सार्वजनिक बांधकाम,पर्यटन आणि नगरविकास विभागाच्या वतीने संयुक्त पाहणी करून कामास सुरवात होईल अशी माहिती संदीप क्षीरसागर यांनी दिली . शहराच्या मध्य भागातुन बिंदुसरा नदी वाहते, या नदी पात्रात सध्या […]

Maharashtra News

हक्काच्या लढ्यासाठी एकत्र या -पंकजा मुंडे

औरंगाबाद -मराठवाड्यातील पाणी प्रश्नांसह अन्य समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजाताई मुंडे येत्या सोमवारी म्हणजे २७ जानेवारीला औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. दरम्यान, एक दिवस आपल्या विभागाच्या भविष्यासाठी देऊन उपोषणात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहे. गोपीनाथगडा वरून १२ […]